नमस्कार! अभिजात नाट्यगंध मराठी नाटक सभासद योजनेत आपले स्वागत आहे. मराठी रंगभूमीवरील अनेक अभिजात आणि सर्वोत्तम नाटके, तसेच सांगीतिक कार्यक्रम यांची मेजवानी आम्ही रसिकांसाठी घेऊन आलो आहोत. त्यातील अधिकाधिक कलाकृतींचा आस्वाद घेऊन मराठी नाट्य परंपरेला रसिक प्रेक्षक एका उत्तुंग शिखरावर नेण्यास आम्हाला साहाय्य करतील अशी आशा आहे.

‘अभिजात नाट्यगंध’
मराठी नाटक सभासद योजना

सभासदत्व नियम आणि अटी

 

१) अभिजात नाट्यगंध मराठी नाटक योजनेचे सभासदत्व (Membership) हे ३ वर्षांसाठी ग्राह्य असेल.
(डिसेंबर २०२८ पर्यंत)
२) सभासद शुल्क Non-refundable आहे. कोणत्याही कारणास्तव ते परत मिळणार नाही.
३) प्रत्येक शहरासाठी / विभागासाठी वेगवेगळे सभासद शुल्क आकारले जाईल. (म्हणजेच एका सभासद शुल्कात दोन अथवा अधिक शहरे / विभाग निवडता येणार नाहीत, त्यासाठी स्वतंत्रपणे शुल्क द्यावे लागेल.)
४) योजना कालावधीत प्रत्येक वर्षी ८ ते १२ नाटके / कार्यक्रम सवलतीच्या दरात पाहता येतील.
५) योजनेत कोणत्या नाटकांचा / कार्यक्रमांचा समावेश असावा हे आमची निवड समिती वेळोवेळी ठरवेल.
६) रंगभूमीवर त्या त्या वेळी सुरू असलेलीच सर्वोत्तम निवडक नाटके अथवा कार्यक्रम योजनेत दाखविली जातील.
७) सदर नाटकाची / कार्यक्रमाची दिनांक व वेळ ५ ते १४ दिवस आधी Whatsapp / SMS द्वारे कळविण्यात येईल.
८) मात्र त्यासाठी 8275442370 हा क्रमांक ‘अभिजात नाट्यगंध’ (Abhijaat Natyagandh) या नावाने आपल्याकडे SAVE असणे गरजेचे आहे. तरच आमच्याकडून आपणास संपर्क साधणे सोयीचे होईल, याची नोंद घ्यावी.
९) योजनेअंतर्गत सुचविलेल्या नाटकाच्या / कार्यक्रमाच्या तिकिटांवर सभासदांना २० % ते ५० % सूट असेल.
१०) ही सूट किती असावी हे नाट्य निर्माते आणि योजनेचे संयोजक प्रत्येक कार्यक्रमाचे स्वरूप / मांडणी / खर्च यावरून ठरवतील.
११) आमच्याकडून त्या त्या महिन्यात सुचविण्यात आलेल्या नाटकासाठी एका सभासदास जास्तीत जास्त ४ तिकिटांवर सवलत मिळेल.
१२) आपणास सुचविलेले नाटक पाहिलेच पाहिजे असे आपल्यावर बंधन नाही. एखाद्या नाटकास जायचे अथवा नाही हा निर्णय सर्वस्वी सभासदांचा असेल.
१३) मात्र एखाद्या “नाटकाऐवजी” दुसरे नाटक बघता येणार नाही. कारण ही वार्षिक योजना नाही. एखाद्या नाटकास जाणे जमले नाही तर पुढील महिन्यात सुचविलेल्या नाटकासाठी जाण्यास आपण पात्र आहातच!
१४) प्रत्येक नाटकाची / कार्यक्रमाची तिकिटे pre-book करणे आवश्यक आहे. ती कशी करावीत याचा सविस्तर मेसेज आपणास वेळोवेळी प्राप्त होईल.
१५) नाट्यगृहात जाऊन तिकिटे book करण्याचा किंवा Cash Payment चा पर्याय उपलब्ध नाही. तिकीट आधी book करून payment करणे अनिवार्य आहे.
१६) प्रयोगाच्या वेळी नाट्यगृहात कोणती रांग (row) असावी याचा निर्णय संयोजक वेळोवेळी घेतील.
१७) कृपया अमुकच रांग मिळावी म्हणून प्रेक्षकांनी अडून बसू नये. आजकाल बऱ्याच नाटकांचे तिकीट दर पहिल्या २० रांगांसाठी समान असतात. आपण कमी दरात नाटक पाहणार आहोत आणि आपल्यापेक्षा अधिक रुपये मोजूनही इतर प्रेक्षक आपल्या ‘मागे’ बसणार आहेत याचाही नम्रपणे विचार करावा.
१८) फक्त पुढूनच नाटक बघायची सवय असलेल्यांनी कृपया योजना घेताना विचार करावा ही नम्र विनंती.
१९) काहीही मदत हवी असल्यास 8275442370 (अभिजात नाट्यगंध) हा क्रमांक या योजनेसाठी राखीव आहे. तो SAVE करावा.
२०) जलद संपर्कासाठी याच क्रमांकावर WhatsApp Message करावा.
२१) Call वर संपर्क केल्यावर आपला Call receive न झाल्यास आपणास पुन्हा call back केला जाईल.
२२) उपर्युक्त नियम आणि अटींमध्ये सुधार अथवा बदल करण्याचा संपूर्ण अधिकार ‘अभिजात नाट्यगंध योजना’ राखून ठेवीत आहे.
२३) वरील सगळ्या नियम आणि अटी स्वीकारूनच आपण सभासदत्व घेतले आहे, हे आपणास मान्य आहे.
२४) संपर्कासाठी कार्यालयीन वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी १०:०० ते सायं. ६:०० वा.पर्यंत. (शनिवार आणि रविवार बंद)

सभासद व्हा  

 

 

x